Home शहर सत्तावीस हजार स्वामी चरित्र पारायणाचा झाला जागतिक विक्रम ! बोल्हेगाव...

सत्तावीस हजार स्वामी चरित्र पारायणाचा झाला जागतिक विक्रम ! बोल्हेगाव स्वामी समर्थ केंद्राला ‘विनर्स बुक ॲाफ इंडिया’कडून समारंभपूर्वक प्रमाणपत्र केले प्रदान

3
सत्तावीस हजार स्वामी चरित्र पारायणाचा झाला  जागतिक विक्रम !  बोल्हेगाव स्वामी समर्थ केंद्राला ‘विनर्स बुक ॲाफ इंडिया’कडून समारंभपूर्वक प्रमाणपत्र केले प्रदान

अहिल्यानगर ( प्रतिनिधी) – येथील बोल्हेगाव परिसरातील संत तुकाराम नगरमधील स्वामी समर्थ केंद्रात (दिंडोरी प्रणित) एकाच वेळी २७ हजार सामूहिक स्वामी चरित्र पारायण सोहळ्याचा जागतिक विक्रम नोंदविण्यात आला असून, त्याबाबतचे प्रमाणपत्र केंद्राला नुकतेच प्रदान करण्यात आले.

केंद्राचे प्रमुख समन्वयक चंद्रशेखर लोळगे काका यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली २५ वर्षांपूर्वी या केंद्राची स्थापना करण्यात आली. केंद्राच्या २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीच्या पार्श्वभूमीवर गेल्या २६ जुलै २०२६ रोजी केंद्राच्या परिसरात २५ हजार सामूहिक स्वामी चरित्र पारायण सोहळ्याचा संकल्प चंद्रशेखर लोळगे काका यांनी सोडला होता. या अभिनव उपक्रमाला अहिल्यानगर शहर व जिल्ह्यासह पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव या शेजारील जिल्ह्यातील स्वामी समर्थ महाराजांचे भक्त व सेवेकरी यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. परिणामी २५ हजारांऐवजी तब्बल २७ हजार भाविकांनी सामूहिक स्वामी चरित्र पठण केले.

विनर्स बुक ऑफ इंडिया या संस्थेने या उपक्रमाची जागतिक विक्रम म्हणून नोंद केली आहे. ‘विनर्स’चे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ध्यानधारणा प्रशिक्षक डॉ. दीपक हारके यांच्या हस्ते या उपक्रमाचे सर्वेसर्वा चंद्रशेखर लोळगे काका यांना जागतिक विक्रमाबाबतचे प्रमाणपत्र केंद्राच्या पटांगणात पार पडलेल्या एका भव्य विशेष समारंभात प्रदान करण्यात आले. लोळगे काका व डॅा. हारके यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

केंद्रातील हरिदास कुमटकर, देवीदास जाधव, अभिजीत नरसाळे, संदीप दुधाडे, किरण भुसे, बाळासाहेब पोकळे, महेश गोसावी, महेश नारखेडे, सतीश अनाप, जालिंदर आरगडे, दीपक लांडे, यशवंत उंडे, सुभाष घोरपडे, आप्पासाहेब गांगुर्डे, लहू लोणकर, नानासाहेब खरात, बाबासाहेब गवांदे, सुरेश आदमाने यांच्यासह केंद्रातील सेवेकरी बंधू-भगिनींनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. अशा प्रकारचा जागतिक विक्रम करणारे बोल्हेगाव फाटा येथील स्वामी समर्थ केंद्र हे राज्यातील पहिलेच केंद्र ठरले असल्याचे भाविकांनी यावेळी स्पष्ट केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here