अहिल्यानगर : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील श्री लक्ष्य सैनिक स्कूल येथे दि. २१, २२ व २३ नोव्हेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत अहिल्यानगरच्या साई एंजल इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत शाळेच्या खेळाडूंनी एकूण सात पदकांची कमाई करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.

या स्पर्धेत शंभुराजे सावंत, विरेन आधाट आणि आर्यन नवघरे यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. तर कार्तिक जगताप याने दोन कांस्यपदके मिळवली. शौर्य कारामुंगे यानेही कांस्यपदकाची कमाई केली.


राज्यस्तरीय स्पर्धेत अहिल्यानगरच्या खेळाडूंनी मिळवलेले हे यश शाळेसाठी अभिमानास्पद ठरले आहे. त्यांच्या या यशामुळे अहिल्यानगरच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशस्वी खेळाडूंना शाळेच्या प्राचार्या पल्लवी जोशी मॅडम, स्वप्निल सर, प्रशिक्षक गौरव घोडके सर आणि जयेश शिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
आता राष्ट्रीय स्पर्धेतही हे खेळाडू चमकदार कामगिरी करून अहिल्यानगरचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






