📰 खबर अहिल्यानगरची
अहिल्यानगर : महावितरण कंपनीकडून ३३ के.व्ही. मुळा डॅम विद्युत वाहिनी व देखभाल दुरुस्ती तसेच एचटी ग्राहकांची सीटी बदलण्याच्या कामासाठी शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या शटडाऊनमुळे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्त्वाची दुरुस्तीची कामेही करण्यात येणार आहेत. परिणामी शहरातील विविध भागांचा पाणीपुरवठा सलग तीन दिवस विस्कळीत राहणार आहे.

शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर : बोल्हेगाव, नागापूर, सावेडी, उपनगरातील गुलमोहर रोड, पाइपलाइन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यानगर, निर्मलनगर, मुकुंदनगर, स्टेशन रोड, आगारकर मळा, केडगाव तसेच नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर आदी भागांचा पाणीपुरवठा होणार नाही. या भागांचा पाणीपुरवठा शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी करण्यात येईल.
शनिवार, दि. २८ नोव्हेंबर : मंगळगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी, गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हिल हडको, प्रेमदान हडको, टी.बी. सेंटर परिसर, म्युन्सिपल हडको, सारसनगर, बुरुडगाव रोड, बालिकाश्रम रोड आदी भागांचा पाणीपुरवठा होणार नाही. या भागांचा पाणीपुरवठा रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी करण्यात येईल.

रविवार, दि. २९ नोव्हेंबर : सिद्धार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, बिस्ता गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर व सावेडी आदी भागांचा पाणीपुरवठा होणार नाही. या भागांचा पाणीपुरवठा सोमवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी करण्यात येईल.
महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, पाणीपुरवठा एक दिवस बंद ठेवून उपनगरातील ज्या भागात जास्त दिवसांचे रोटेशन आहे, अशा भागात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून महानगरपालिकेस सहकार्य करावे.





